#Roads & Transport
Target:
Chief Justice- Nagpur Bench of Mumbai High Court
Region:
India

जनहित याचिका:
प्रति - आ. उच्च न्यायाधीश , मुंबई उच्च न्यायालय (नागपूर खंडपीठ)
तेल्हारा  तालुक्यातील (जिल्हा अकोला-महाराष्ट्र ) रस्त्यांची दयनीय अवस्था

पाच ते सात वर्षापासून तेल्हारा ते अडसूळ फाटा, तेल्हारा ते हिवरखेड , तेल्हारा ते वरवट , तेल्हारा ते वारुळा या रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था आहे. कितीतरी अपघात झाले, १२ जीव गेले,ज्येष्ठ नागरिक जिल्ह्याच्या ठिकाणी आरोग्य इत्यादी तपासणी साठी जाऊ शकत नाहीत, नागरिकांच्या वाहनांना समस्या होत आहेत आणि मूलभूत अधिकार बाधित झाले आहेत. तालुक्यातील शंभर गावे आणि अंदाजे दोन लाख लोकसंख्या या समस्येमुळे प्रभावित आहे. हे रस्ते नीट व्हावेत म्हणून आंदोलने झाली, उपोषणे झाली, मंत्री येऊन गेले पण पुढे काहीही हालचाल झालेली नाही.अशा विदारक वास्तवाचे शासनाला भान नाही आणि कोणतीही कारवाई दिसत नाही.शासनाने जनतेला याचे उत्तर देणे आवश्यक आहे आणि त्वरित कारवाई सुद्धा आवश्यक आहे.उच्च न्यायालयाला विनंती आहे की त्यांनी संबंधित अधिकारी आणि खाते यांना निश्चित कालावधीत उचित कारवाई चा आदेश द्यावा.संबंधित कामाची अनेक कंत्राटे निघालेली आहेत पण तरीही कामे वर्ष न वर्षे प्रलंबित आहेत. त्यात भ्रष्टाचार आणि कामे पूर्ण न झाल्याची कारणे यांचाही तपास करावा अशी अपेक्षा आहे.
याचिका कर्ते : तेल्हारा तालुक्यातील नागरिक , याचिका लिहिणार : रजनीश P.
Public Interest Litigation: To : Hon. Chief Justice , Mumbai High Court - Nagpur Bench regarding Poor condition of roads in Telhara taluka (District Akola-Maharashtra)
Youtube link - https://youtu.be/wpDRpJEiVyQ
The roads from Telhara to Adsul Fata, Telhara to Hivarkhed, Telhara to Varvat, Telhara to Warula have been in a very poor condition for the last five to seven years. Many accidents have taken place, 12 lives have been lost, Senior citizens cannot go to the district aplce for health check-ups etc., citizens' vehicles are facing problems and basic rights have been violated. 200,000 people living in about 100 villages are affected due to this issue. There have been agitations, hunger strikes, ministers have come and gone but no further action has been taken. The government is not aware of such a stark reality and no action has been taken. Hon. High Court should order concerned officers and the departments to take appropriate action within a certain period of time. It is also expected that investigation be conducted if any corruption and why non-compliance on the subject has taken place.
Petitioners: Citizens of Telhara taluka, petition writer : Rajneesh P.

आम्ही खालील सही करणार मुंबई उच्च नायालयाच्या नागपूर खंडपिठाच्या आ.मुख्य न्यायाधीश यांना नम्र विनंती करतो की त्यांनी वरील याचिकेवर सामाजिक बांधकाम विभाग महाराष्ट्र , केंद्र सरकार रस्ते विभाग, जागतिक बँक , ठेकेदार आणि इतर संबंधित संस्थांना बोलावून विषयावर उचित कारवाई करावी, चौकशी करून दोषीवर कारवाई करावी आणि तालुक्यातील अंदाजे दोन लाख लोकांनां न्याय द्यावा.
याचिका कर्ते : तेल्हारा तालुक्यातील नागरिक
Request to Hon. Chief Justice-Nagpur Bench of Mumbai High Court to take cognizance of the issue and direct concerned parties to act immediately and ensure welfare of about 100 affected villages and 200,000 population.
Petitioner - People from Telhara Tehsil , Akola District, Maharashtra , India

GoPetition respects your privacy.

The जनहित याचिका: तेल्हारा तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था आणि शासकीय अनास्था (Public Interest Litigation - Pathetic Road conditions in Telhara Tehsil and apathy of Govt.) petition to Chief Justice- Nagpur Bench of Mumbai High Court was written by Raj P. and is in the category Roads & Transport at GoPetition.