- Target:
- Chief Minister of Maharashtra
- Region:
- India
- Website:
- www.facebook.com
सक्षम सातारा - आमचा सातारा अभियान
अभिमानाने सांगा,
होय… हा "आमचा सातारा"
'माझं गाव ' हा अभिमान प्रत्येकाला असतो. आपल्यालाही 'माझा सातारा' म्हणून निर्विवाद गर्व - अभिमान असायला हवा.
परंतु, पालिकेतील गैरकारभार, भ्रष्टाचार, प्रशासन - पदाधिकारी यांच्यातील समन्वयाचा अभाव, अनागोंदी आणि गैरप्रकारामुळे महाराष्ट्रभर झालेली साताऱ्याची बदनामी … !
हेच का पालिकेतल्या एकाधिकारशाहीचे फलित ?
शांतता व सुखाने सातारकर म्हणून जगू इच्छिणाऱ्या सामान्य जनतेला किमान मुलभूत सुविधा नको का मिळायला ?
छातीठोकपणे, 'सातारकर' म्हणायचे असेल
तर चला 'सक्षम सातारा - आमचा सातारा' मोहिमेत सहभागी व्हा …
श्री. बालाजी चंरिटेबल ट्रस्ट साताऱ्याच्यावतीने
१. मुख्यमंत्री, महाराष्ट्र.
२. नगर विकास मंत्री, महाराष्ट्र.
३. पालक मंत्री, सातारा जिल्हा.
४. जिल्हाधिकारी, सातारा जिल्हा.
५. मुख्याधिकारी, सातारा नगर पालिका.
यांना क्रांती विरांच्या जन्मभुमी मध्ये पुन्हा एकदा क्रांती घडविण्यासाठी आपण मुलभूत हक्कIच्या प्रश्नासंदर्भात निवेदन देणार आहोत, तरी या निवेदनावर
अभिमानाने 'सक्षम सातारा - आमचा सातारा' म्हणण्यासाठी
गरज आहे ती फक्त आपल्या स्वाक्षरीची.
या मोहिमेत आपण सहभागी व्हाल, ही अपेक्षा.
तरी आपण या फेसबुकच्या माध्यमातून या मोहिमे मध्ये सहभागी व्हावे ही नम्र विनंती.
आपला,
राजेंद्र चोरगे
एक सातारकर
(टिप : जो पर्यंत नागरीकांना नगर पालिकेकडून मुलभूत सुविधा (चांगले रस्ते, पुरेसे पाणी आणि स्वच्छता) मिळत नाहीत तो पर्यंत नगर पालिकेच्या कर (घरपट्टी) सातारकरांनी भरू नये. मात्र कर भरण्याचे आर्थिक नियोजन करावे.)
अधिक माहितीसाठी संपर्क : श्री. बालाजी चंरिटेबल ट्रस्ट, १३५ भवानी पेठ, सातारा.
पालिकेतील गैरकारभार, भ्रष्टाचार, प्रशासन - पदाधिकारी यांच्यातील समन्वयाचा अभाव, अनागोंदी आणि गैरप्रकारामुळे महाराष्ट्रभर झालेली साताऱ्याची बदनामी … !
हेच का पालिकेतल्या एकाधिकारशाहीचे फलित ?
शांतता व सुखाने सातारकर म्हणून जगू इच्छिणाऱ्या सामान्य जनतेला किमान मुलभूत सुविधा नको का मिळायला ?
छातीठोकपणे, 'सातारकर' म्हणायचे असेल
तर चला 'सक्षम सातारा - आमचा सातारा' मोहिमेत सहभागी व्हा …
श्री. बालाजी चंरिटेबल ट्रस्ट साताऱ्याच्यावतीने
१. मुख्यमंत्री, महाराष्ट्र.
२. नगर विकास मंत्री, महाराष्ट्र.
३. पालक मंत्री, सातारा जिल्हा.
४. जिल्हाधिकारी, सातारा जिल्हा.
५. मुख्याधिकारी, सातारा नगर पालिका.
यांना क्रांती विरांच्या जन्मभुमी मध्ये पुन्हा एकदा क्रांती घडविण्यासाठी आपण मुलभूत हक्कIच्या प्रश्नासंदर्भात निवेदन देणार आहोत, तरी या निवेदनावर
अभिमानाने 'सक्षम सातारा - आमचा सातारा' म्हणण्यासाठी
गरज आहे ती फक्त आपल्या स्वाक्षरीची.
या मोहिमेत आपण सहभागी व्हाल, ही अपेक्षा.
तरी आपण या फेसबुकच्या माध्यमातून या मोहिमे मध्ये सहभागी व्हावे ही नम्र विनंती.
आपला,
राजेंद्र चोरगे
एक सातारकर
(टिप : जो पर्यंत नागरीकांना नगर पालिकेकडून मुलभूत सुविधा (चांगले रस्ते, पुरेसे पाणी आणि स्वच्छता) मिळत नाहीत तो पर्यंत नगर पालिकेच्या कर (घरपट्टी) सातारकरांनी भरू नये. मात्र कर भरण्याचे आर्थिक नियोजन करावे.)
अधिक माहितीसाठी संपर्क : श्री. बालाजी चंरिटेबल ट्रस्ट, १३५ भवानी पेठ, सातारा.
You can further help this campaign by sponsoring it
The सक्षम सातारा - आमचा सातारा अभियान petition to Chief Minister of Maharashtra was written by Shri Balaji Charitable Trust and is in the category Civil Rights at GoPetition.